Family Pension Rules | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘फॅमिली पेन्शन’ची मर्यादा वाढवली, दरमहा मिळणार ‘एवढी’ रक्कम; जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या (Modi Government) संरक्षण मंत्रालयाने (Defence Minister) दिवाळीपूर्वी फॅमिली पेन्शनसंदर्भात (Family Pension Rules) एक मोठी घोषणा केली आहे. मंत्रालयाने मुलांना देण्यात येणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनाची (Family Pension Rules) कमाल मर्यादा वाढवली आहे. ज्या मुलांचे पालक (आई-वडील) दोघेही संरक्षण मंत्रालयात काम करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) कक्षेत येणे आवश्यक आहे आणि त्याच वेळी मुलाचे नाव दोघांच्या नॉमिनीमध्ये (Nominee) समाविष्ट कले जाणे आवश्यक आहे.

 

पेन्शनची रक्कम एवढी वाढवली
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, 7 व्या वेतन आयोगांतर्गत सरकारी सेवेत असलेल्यांसाठी सर्वाधिक पेन्शन पेमेंटमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ती दरमहा 2.5 लाख रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ पेन्शनधारकांच्या (Family Pension Rules) कुटुंबीयांना जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते, ज्यामध्ये पेन्शनच्या सर्व स्त्रोतांचा समावेश असेल. ही दुरुस्ती 1 जानेवारी 2016 पासून अंमलात आणली जाण्याची शक्यता आहे.

 

काय म्हटले मंत्रालयाने ?
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने (Pensioners Welfare Department) दोन्ही पालकांच्या (आई-वडील) एका मुलाला किंवा दोन मुलांना देय असलेल्या कौटुंबिक पेन्शनची कमाल मर्यादा 1.25 लाख प्रति महिना (2.5 लाख रुपये सामान्य कुटुंब निवृत्ती वेतनाच्या 50 टक्के वाढीव दराने ) आणि 75 हजार रुपये प्रति महिना (सामान्य कुटुंब निवृत्ती वेतनाच्या 30 टक्के) करण्यात आली आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2016 पासून लागू असल्याचे मानले जाईल.

 

Web Title :- Family Pension Rules | Modi government defence ministry announces big change in family pension rules check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | काय सांगता ! होय, पत्नीनं खोट्या तक्रारी करून नातेवाईकांमध्ये केली ‘बदनामी’; वैतागून पतीची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Rohit R R Patil | दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला ‘या’ आजीकडून ‘ऑफर’ अन् ‘सल्ला’ (व्हिडिओ)

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,399 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी