शर्मिला, करीना आणि सारासोबत ‘NO PHOTO’ मूडमध्ये दिसला तैमूर अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- सोहा अली खानने सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेयर केला आहे. फोटो मध्ये शर्मिला टैगोर, सैफ अली खान, करीना कपूर खान, तैमूर अली खान, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान दिसून येत आहे. व तसेच तैमूर अली खान “नो फोटो मूड” मध्ये दिसून येत आहे. फोटो शेयर करतांना सोहाने लिहिले- “एका झाडाच्या फांद्यांसारखे.” पतौडी कुटुंबांचे हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकतेच सोहा आणि इब्राहिम सैफ-करीना यांच्या घराबाहेर दिसून आले होते. दोन्ही फोटो इंटरनेटवर खूप शेयर झाले होते . सारा आणि इब्राहिम हे अमृता सिंग आणि सैफ अली खानचे मुले आहेत.एका मुलाखतीत साराने सांगितले की ती करीनाची मोठी फॅन आहे. करिनाने कारण जोहरच्या चॅट शो मध्ये सांगितले की सारा क्लासी आहे. या आधी करिनाने साराला ब्यूटी आणि ब्रेनचा रेयर कॉम्बिनेशन आहे. तिच्या काम बद्दल बोला तर सध्या सारा अली खान लव आजकाल 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

अक्षय कुमारच्या फिल्म गुड न्यूजमध्ये करीना दिसणार आहे. याशिवाय, करीना इरफान खानच्या अंग्रेजी मीडियम मध्येदेखील दिसून येईल. सैफ अली खान लाल कप्तान चित्रपटात दिसेल. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सोहा अली खान काही दिवसांपासून बॉलीवूड पासून दूर आहे.