सामूहिक बलात्काराच्या आरोपीच्या रिलेशनशिपमध्ये ‘ही’ प्रसिध्द बंगाली अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली सुपरहिट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Actress Nusrat Jahan) 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील खासदार नुसरत जहाँ हे चर्चेतील व्यक्तिमत्व आहे. मात्र, आता नुसरत जहाँ यांचे नाव एका सामूहिक बलात्कारातील आरोपीशी देखील जोडले गेले आहे. एवढेच नव्हे तर दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

5 फेब्रुवारी 2012 ला कोलकाताच्या पार्क स्ट्रिट परिसरात एका विवाहित महिलेवर पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आणि चालत्या गाडीतून फेकून भामटे फरार झाले होते. ही घटना उघडकीस येताच मोठ्या असंतोष व्यक्त केला गेला होता.पोलीसांनी याचा तपास सुरु केल्यानंतर तीन आरोपीना तात्काळ अटक केली. मात्र दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींमध्ये कादर खान आणि मोहम्मद अली यांचा समावेश होता. नुसरत जहाँ तेव्हा कादर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या.

सामूहिक बलात्कार घटनेच्या काही महिने आधीच दोघांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली होती. त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय़ घेतला होता. मात्र, हे सर्व होत असताना बाकीच्या त्यांना अडचणी आणणाऱ्या गोष्टी ही सोबत घडत होत्या. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतरही फरार आरोपी कादर खान नुसरत जहाँ यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांनी ही गोष्ट लपवल्याचा आरोप करण्यात आला होता.