प्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं ‘कोरोना’मुळं निधन, अहमदाबादमध्ये घेतला अंतिम श्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिध्द ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं 90 व्या वर्षी अहमदाबादच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये निधन झालं आहे. बेजान दारूवाला यांंचा मुलगा नास्तुर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना निमोनियाचा आजार होता. बेजान दारूवाला यांना कोरोना व्हायरस झाल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरस मुळं त्यांचं निधन झालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या एक आठवडयापासून दारूवाला यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.