Narendra Chanchal Death News : ‘चलो बुलावा आया है’ फेम ‘भजनसम्राट’ नरेंद्र चंचल याचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन

पोलिसनामा ऑनलाईन – चलो बुलावा आया है, ओ जंगल के राजा मेरी मैया को लेके आजा अशा भजनांनी लोकांचं मन जिंकणारे आणि त्यांच्या मनावर राज्य करणारे भजनसम्राट नरेंद्र चंचल (Narendra Chanchal) यांचं 80 व्या वर्षी निधन झालं आहे. नरेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी जवळपास 12.15 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी अनेक प्रसिद्ध भजनांसोबत हिंदी सिनेमातील गाणीही गायली आहेत.

नरेंद्र चंचल यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नरेंद्र चंचल ते नाव आहे ज्यांनी मातेच्या जागरणाला वेगळीच दिशा दिली. त्यांनी फक्त शास्त्रीय संगीतातच नाव नाही कमावलं तर लोकसंगीतातही त्यांनी लोकांचं मन जिंकलं आहे.

नरेंद्र चंचल यांनी लहानपणापासूनच आपली आई कैलाशवती यांना माताराणीची भजनं गाताना ऐकलं आहे. आईची भजनं ऐकून त्यांनाही संगिताची आवड निर्माण झाली. त्यांची पहिली गुरू त्यांची आई होती. यानंतर त्यांनी प्रेम त्रिखा यांच्या कडून संगिताचं शिक्षण घेतलं. यानंतर ते भजन गाऊ लागले.

चंचल यांचा बॉलिवूडमधील प्रवास हा राज कपूर सोबत सुरू झाला होता. बॉबी या सिनेमात त्यांनी बेशक मंदिर मस्जिद तोडो हे गाणं गायलं होतं. यानंतर त्यांनी अनेक सिनेमात गाणं गायलं. आशा या सिनेमात त्यांनी गायलेल्या चलो बुलावा आया है या भजनानं त्यांना खूप ओळख मिळाली. या गाण्यानं ते रातोरात फेमस झाले.

अलीकडेच चंचल यांनी कोरोनाबद्दल एक गाणं गायलं होतं जे खूप व्हायरल झालं होतं. वैष्णवी मातेवर त्यांची खास श्रद्धा होती. 1944 सालापासून ते सतत वैष्णव देवीच्या दराबारात आयोजित होणाऱ्या वार्षिक जागरण मध्ये हजेरी लावत होते. परंतु कोरोनामुळं यावेळी ते शक्य झालं नव्हतं.