दिग्दर्शक राम गोपाल वर्माचं या पॉर्नस्टारशी ‘झेंगाट’, ट्विट्स ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र यावेळी ते चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. राम गोपाल वर्मा आणि पॉर्न स्टार मिया माल्कोवा यांच्यात प्रेमाची खिचडी शिजत आहे. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटत असेल परंतु असेच काहीसे दिसून आले आहे. याबाबत वृत्त समोर येताना दिसत आहे.

राम गोपाल वर्मांनी पॉर्न स्टार मिया माल्कोवाची स्तुती करत तीन-चार ट्विट्स केले आहेत त्यानंतर या वृत्तांनी जोर धरला आहे. मिया माल्कोवाच्या वाढदिवसानिमित्त राम गोपाल वर्मा यांनी १ जुलै रोजी शेवटचं ट्विट केलं होतं.

१ जुलै नंतर मात्र राम गोपाल वर्मा यांनीही एकही ट्विट केलेलं नाही. ही बाब आणखीच विचार करण्यास भाग पाडत आहे हे मात्र नक्की. त्यांच्या सत्या या सिनेमाने २१ वर्ष पूर्ण केले आहेत तरीही त्यांनी काही ट्विट केल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे ट्विट पाहणारा त्यांच्या आणि मियाबाबत काही वेगळाच विचार करत आहे.

आणखी एक बाब लक्षात घेता तुम्ही नक्की चकित व्हाल की, अभिनेता मनोज वाजपेयीनेदेखील सत्या सिनेमाला २१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिलेली, नाही कोणतंही ट्विट केलं. राम गोपल वर्मांना तर ट्विट करण्यास वेळंच नाही कारण ते दुसरीकडेच व्यस्त आहेत. राम गोपाल वर्मा यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी त्यांचे ट्विट पाहत असेच अंदाज लावले जात आहेत.

अनेकांना माहिती नसेल परंतु मिया माल्कोवाला घेऊन राम गोपाल वर्मा यांनी ‘गॉड, सेक्स अँड ट्रुथ’ हा सिनेमा केला होता. या सिनेमाचं पोस्टर चांगलंच चर्चेत आलं होतं. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये मिया न्यूड दिसली होती. महत्त्वाचे म्हणजे याच पोस्टरमध्ये राम गोपाल वर्मादेखील दिसत आहेत.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या , कारण …

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या , कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

You might also like