‘या’ मराठी डिझायनरनं बनवली इवांका ट्रम्पची खास ‘शेरवानी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प सोमवारी (दि 24 फेब्रुवारी) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. सर्वात आधी ते अहमदाबादला गेले आणि त्यानंतर दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांनी आग्र्यातील ताज महालला भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी इवांका ट्रम्प आणि त्यांचा जावईदेखील होता.

इवांका आज (मंगळवार दि 25 फेब्रुवारी) चक्क शेरवानीमध्ये दिसली. इवांकानं आपल्या ड्रेसला इंडियन टच दिला आहे. खास बात अशी की, ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनरनं डिझाईन केली आहे. अनिता डोंगरे असं या डिझायनरचं नाव आहे.

शेरवानीबद्दल सांगायचं झालं तर ही शेरवानी प्युअर सिल्कनं बनवली आहे. या प्रकारच्या शेरवानीचं नाव सुरूही शेरवानी आहे. पश्चिम बंगालमधील कारागिरांनी आपल्या हातानं या शेरवानीची शिलाई केली आहे. या शेरवानीचं स्टाईल स्टेटमेंट वाढवणाऱ्या फ्रंट बटन्सवर अनिता डोंगरेचा ब्रँड सिग्नेचर एलिफंटचा लोगो आहे. या ड्रेसच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर अनिता डोंगरेच्या वेबासाईटवर या शेरवानीची किंमत 82,400 दाखवण्यात येत आहे.

काहींनी केलं कौतुक तर काहींची अनितावर टीका
अनिता डोंगरेनं स्वत: इंवाका ट्रम्पचे काही फोटो सोशलवरून शेअर केले आहेत. काहींना हा ड्रेस आवडला आहे असं दिसत आहे. काहींना या ड्रेसचं आणि इवांकाचंही कौतुक केलं आहे तर काहींनी अनितावर टीकाही केली आहे. एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, जो ब्रँड डायव्हर्सिटीला सेलिब्रेट करतो तो त्या उलट विचारधारा असणाऱ्यांचे कपडे तयार करत आहे.