‘या’ प्रसिद्ध ज्वेलर्स कंपनीनं जाहीर केली ‘दिवाळखोरी’, सराफ बाजारात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुवर्णकार, ज्वेलर्स हे पूर्वी केवळ आपल्या शहरापुरती प्रसिद्ध करीत असताना संपूर्ण राज्यभरात आपल्या आकर्षक जाहिराती करुन लोकप्रियता मिळविणाऱ्या त्रिभुवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रा. लि. या ज्वेलरी व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपली दिवाळखोरी जाहीर केल्याने सुवर्ण बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

खासगी वाहिन्या सुरु झाल्यानंतर सर्व प्रथम त्रिभुवनदास भीमजी झवेरी या सराफ व्यवसायाच्या जाहिराती लोकांच्या ओठावर रुळल्या. त्या काळात दिवाळी अंकातील सर्वात महागडी समजली जाणारी शेवटच्या पानाची जाहिरात ही त्रिभुवनदास झवेरी यांची असायची. कधीही दादरला न गेलेल्यांनाही दादर ला ही सराफी पेठी असल्याचे माहिती राज्यभरातील लोकांना झाली होती. अशा जुन्या सराफ पेठीच्या रिटेल कंपनीने आपली दिवाळखोरी जाहीर केली आहे. त्याला इन्सोलव्हन्सी अ‍ँड बँकरुप्सी बोर्डाने त्यांच्या या दिवाळखोरीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

त्यानंतर ज्यांना ज्यांना त्रिभुवनदास भीमजी झवेरी अ‍ँड सन्स रिटेल कंपनीकडून येणे आहे. त्यांनी आपले क्लेम ३ जानेवारी २०२० पर्यंत सादर करावेत, असे नोटिसीद्वारे जाहीर केले आहे.

एका बाजूला सराफ व्यावसायिक कात टाकून वेगवेगळ्या शहरात आपल्या शाखा काढत असताना एका जुन्या पिढीच्या सवर्ण व्यावसायिकांने आपली कंपनी दिवाळखोरीत काढण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सराफ व्यवसायिकांमध्ये एकच चर्चेचा विषय झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/