सुप्रसिद्ध गीतकार, कवी मंदार चोळकर यांच्या गीतलेखन कार्यशाळेचे आयोजन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध गीतकार, कवी मंदार चोळकर यांच्या गीतलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटांसाठी, मालिकांसाठी गाणी लिहिणे, झिंगल्स लिहिणे इत्यादी विषयांवर मंदार चोळकर मार्गदर्शन करणार आहेत. आजवर मंदार चोळकर यांनी सरकार 3, दुनियादारी, कट्यार काळजात घुसली, दगडी चाळ, मितवा, हृदयांतर, बकेट लिस्ट, क्लासमेट्स, सविता दामोदर परांजपे, ठाकरे अशा 100 हून अधिक सिनेमांसाठी गाणी लिहीली आहेत. याशिवाय अनेक लोकप्रिय मालिकांचं शीर्षकगीत त्यांनी लिहिलं आहे. आपल्या छंदाचं रुपांतर व्यवसायात करू पाहणाऱ्या, कविता आणि गझल लिहिणाऱ्यांना या कार्यशाळेचा खास उपयोग होणार आहे, त्यामुळे लिहू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे.

या कार्यशाळेचे आयोजन रविवारी, दिनांक २८ एप्रिल रोजी बुक इस्टेब्लिशमेंट कॅफे, सेनापती बापट रोड, येथे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पुढील मोबाईलनंबरवर संपर्क करू शकता. मोबा- 7378305403

song