‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पाहतेय हॉलिवूडमध्ये कामाचे स्वप्न

 मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – पप्पी दे पारूला म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी तसेच हॉट आणि बोल्ड फोटोजमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिला हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. तिने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बिग बॉसमुळे ती अधिकच लोकप्रिय झाली. परंतु आता तिला हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे तसे तिचे स्वप्न आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने याबाबत माहिती दिली.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न असल्याचे सांगतिले यावेळी बोलताना ती म्हणाली, “कलाकारांनी कधीच स्वतःला सीमित ठेवले नाही पाहिजे. कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे.” असेही ती म्हणाली. याशिवाय, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खूप टॅलेटेंड आहेत ते तर कुठेही आपली कमाल दाखवू शकतात, असे मत स्मिताने व्यक्त केले.

स्मिता गोंदकर सोशल मीडियावर नेहमची अ‍ॅक्टीव्ह असते. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असते. इन्स्टाग्रामवर ती नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो टाकत असते. तिचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना भुरळ घालतो. नुकतेच तीने एक नवीन फोटोशूट केले आहे. त्यात ती ग्लॅमरस तर दिसतेच परंतु रॉकिंगही दिसत आहे. तिच्या या फोटोंना सोशलवर चाहत्यांची पसंती मिळत आहे.