नैराश्यासमोर हारले प्रसिद्ध गणिताचे शिक्षक, 14 व्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – गुजरातच्या अहमदाबादमधील पालडी भागातील सुप्रसिद्ध गणिताचे शिक्षक पार्थ टांक यांनी आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पार्थ यांनी 14 व्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या केली. पार्थ टांक काही काळ नैराश्याने ग्रस्त होते आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पलाडी भागातील वृंदावन सोसायटीमध्ये राहणारे पार्थ जयंती भाई टांक यांना पत्नी व दोन मुले आहेत. ते अहमदाबादमधील गणिताचे एक अतिशय प्रसिद्ध शिक्षक होते, यांच्या क्लाससाठी विद्यार्थ्यांना वर्षाच्या अगोदर बुक करावे लागत असे. पलाडी धरणीधर देरासर जवळील मंगलतीर्थ परिसरात पार्थ टांक गणिताचा क्लास घेत असत.

पार्थ टांक यांनी गेल्या वर्षी गुजराती चित्रपटात स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले होते, ज्यामध्ये ‘शिक्षक ऑफ द इयर’ नावाचा एक गुजराती चित्रपटही बनला होता. बहुतेक शूटिंगही त्यांच्या क्लासेसजवळच झाले होते. पण पार्थ बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनचे शिकार होते. ते मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होते. पार्थ हे वासाना येथील राज्य यश कॉम्प्लेक्सच्या हेल्थ क्लबचा नियमित सदस्य होते आणि नियमित व्यायामासाठी जात असे. आज सकाळी आपल्या दिनचर्यानुसार ते हेल्थ क्लबकडे घराबाहेर पडले. आपल्या दैनंदिन वेळापत्रकानुसार व्यायामही केला.

जिममध्ये सकाळी 9 वाजता महिलांचा व्यायम सुरू होणार होता. दरम्यान, अचानक राजयश कॉम्प्लेक्सच्या दरवाजावर कोणीतरी पडल्याचा आवाज आला. सर्व लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा पार्थ हे जमिनीवर पडलेले दिसले. पार्थ टांकच्या चालकाने घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. वासना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.