संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे निधन, कोरोना पॉझिटिव्ह होते; 90 च्या दशकात आशिकी चित्रपटातून मिळाली ओळख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ’आशिकी’चे स्मरणीय संगीत देणारी प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण पैकी श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दोन दिवसांपूर्वी ते कोरोना संक्रमित झाल्याचे वृत्त समोर आले होते. श्रवण यांना डायबिटीज होता, ज्यामुळे कोरोनाने त्यांची फुफ्फुसे पूर्णपणे संक्रमित झाली होती. श्रवण यांच्यावर रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. श्रवण यांच्या निधनाची बातमी गीतकार समीर अनजान यांनी शेयर केली.

अनेक अवयवांनी काम करणे केले बंद
रहेजा हॉस्पिटलमधून डॉ. कीर्ती भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ. भूषण यांनी म्हटले की, श्रवण यांचे निधन रात्री 9:30 वाजता झाले. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केले परंतु ते यातून बाहेर येऊ शकले नाही. श्रवण यांच्या मृत्यूचे कारण कोविड संसर्गामुळे झालेला कार्डियोमायोपॅथी होते, ज्यामुळे त्यांना पल्मोनरी एडिमा आणि मल्टीपल ऑर्गन फेलियर झाले होते.

समीर म्हणाले – माझा मित्र गेला
समीर अंजान यांनी भावनिक होऊन म्हटले की, माझा मित्र गेला. माझ्या शब्दांना संगीत देणारा, ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहचवणारा संगीतकार गेला. भावा इतकी घाई काय होती. इश्वराने तुला श्री-चरणांत स्थान द्यावे. वहिणी आणि मुलांना हे दुख सहन करण्याची शक्ती द्यावी.

सुरांनी सजवले नव्वदचे दशक
श्रवण बॉलीवुडमधील प्रसिद्ध संगीतकार होते. नदीम-श्रवणची जोडी 90 च्या दशकात सर्वात चर्चित जोडी होती. गुलशन कुमार मर्डर केसमध्ये नाव आल्यानंतर श्रवण यांचा सहकारी नदीम इंग्लंडमध्ये पळाला. 2002 मध्ये एका भारतीय कोर्टाने पुरावे नसल्याने त्याच्या विरूद्ध हत्येत सहभागी असल्याची केस रद्द केली, परंतु त्याच्या अटकेचे वॉरंट मागे घेतले नाही, ज्यामुळे नदीम आजही अस्वस्थ आहे. नंतर श्रवणपासून त्यांची जोडी तुटली आणि नंतर 2005 चित्रपट ’दोस्ती : फ्रेंड्स फॉर एवर’ आल्यानंतर हे दोघे कोणत्याही चित्रपटाला एकत्र संगती देऊ शकले नाही.

नदीम-श्रवण जोडीचे प्रसिद्ध चित्रपट
आशिकी, साजन, दिल है कि मानता नहीं, सडक, सैनिक, दिलवाले, राजा हिंदुस्तानी, फूल और कांटे, परदेस, ये दिल आशिकाना, राज, कयामत, दिल है तुम्हारा, बेवफा आणि बरसात. नदीम यूकेत रहात असतनाही श्रवणने मोठ्या कालावधीपर्यंत जोडीच्या नावानेच संगीत बनवले.