‘बुलाती है मगर जाने का नही …’ फेम शायर हरपला ! सुप्रसिध्द गीतकार राहत इंदौरी यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उर्दूमधील सुप्रसिध्द शायर, गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. आजच सकाळी त्यांनी ट्विट करून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. राहत इंदौरी यांना काल रात्री इंदौर येथील ऑरबिंदो हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनाचे सुरवातीचे लक्षण दिसल्यानंतर आपण कोरोनाची टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं ट्विट इंदौरी यांनी केलं होतं.

मी सध्या ऑरबिंदो हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट असून प्रार्थना करा की मी या आजारातून लवकरात लवकर बरा होईल, आणखी एक विनंती करतो म्हणून त्यांनी घरच्यांना फोन नका करू. माझ्याबद्दल तुम्हाला ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळत जाईल असं सांगितलं होतं. दरम्यान, काही वेळापुर्वी मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिध्द उर्दू शायर राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे.

इंदौरमधील स्थानिक पत्रकार शुरैह नियाजी यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पीटलकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे राहत इंदौरी यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. त्यांना कोरोना आणि श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून रूग्णालयात दाखल केलं होतं.