अपघातात प्रसिध्द गायिका गीता माळी यांचे निधन, पती गंभीररित्या जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं अपघातात निधन झालं आहे. त्या मुंबईहून नाशिकला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गीता माळी मरण पावल्या. त्यांचे पती विजय माळी सध्या गंभीर जखमी आहेत. विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जाताना दिसत आहे.

गीता माळी 3 महिन्यांसाठी अमेरिकेला गेल्या होत्या. नुकत्याच त्या अमेरिकतून परतल्या होत्या. मंबई विमानतळावर आल्यानंतर पती विजय माळी कारमधून त्यांना घ्यायला आले. दोघेही नाशिकला येत होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांची गाडी ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात होती. यावेळी लाहे फाटानजीक असताना गाडीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात त्यांचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कंटेनरला धडकली.
Geeta Mali

या भीषण अपघातानंतर त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे पती विजय हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

गीता माळी यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, संगीत क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि मोठा नावलौकिक त्यांनी मिळवला होता. 2017 साली ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like