प्रसिद्ध सतारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या व्हायरसची लागण झाल्याने आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. फिल्म, टीव्ही आणि म्युझिक इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध सतारवादक आर्टिस्ट प्रोफेसर प्रतिक चौधरी यांचे निधन झाले आहे. त्यांनी पहाटे अडीचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

प्रतिक चौधरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिक चौधरी यांचे वडील पंडित देबू चौधरी यांचाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. प्रतिक चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनीही श्रद्धांजली दिली आहे. एका फॅन्सने लिहिले, की ‘अत्यंत दु:खाने सांगू इच्छितो, की आमचा जिगरी मित्र आणि सहकारी प्रोफेसर प्रतिक चौधरी आपल्यात नाही. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाने त्यांचा मृत्यु झाला. काही दिवसांपूर्वी देबू चौधरी यांचेही कोरोनाने निधन झाले होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना आधार मिळो. ही मोठी हानी आहे. ओम् शांति शांति शांति…असे लिहिले आहे.

दरम्यान, संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया यांचेही निधन झाले होते. त्यांनी मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाण्यांची रचना केली होती.