आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखिका आणि आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे यांचे निधन झाले आहे. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होेते.

मीना यांनी आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा, अत्र्यांच्या कर्‍हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड 6-7-8), पपा – एक महाकाव्य मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कर्‍हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उतार्‍यांचे संपादित चित्रमय संकलन, ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी) लेखन त्यांनी केले होते.