अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘असा’ प्रश्न ऐकून चाहते हैराण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आपल्या लुक आणि फोटोंमुळं कायमच चर्चेत येत असते. यावेळी अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिनं चाहत्यांना एक हैराण करणारा प्रश्न विचारला आहे. तिनं चाहत्यांसोबत काही फोटोही शेअर केले आहेत.

अंकितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत ती काही विनोदी हावभाव करताना दिसत आहे. तिनं केसंही मोकळे सोडले आहे . कॅप्शनमधून तिनं एक प्रश्न विचारला आहे आणि चाहत्यांना तिनं ती कन्फ्यूज असल्याचं सांगितलं आहे.

अंकितानं शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, शॉर्ट हेअर की लाँग हेअर. कन्फ्यूजन आहे. फोटोत ती केसांसोबत खेळताना दिसत आहे. तिनं पिंक कलरचा शर्टही घातला आहे.

अंकिताचा असा प्रश्न पाहून चाहते आधी तर हैराण झाले. नंतर मात्र काही चाहत्यांनी तिला सजेशन दिले आहेत. काहींनी तिला सल्ला दिला आहे की, तिनं केस लहान करू नये. लांब केस तिला सुंदर दिसतात असंही अनेकांनी सांगितलं आहे, तर काहींनी मात्र तिला लुकसोबत एक्सपेरीमेंट करायला सांगितलं आहे.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.