WESTERN LOOK नंतर ‘अशा’ अवतारात ‘जयडी’च्या फोटोंनी चाहते पागल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लागिरं झांल जी ही मालिका सध्या चांगलीच गाजताना दिसत आहे. अंजिक्य आणि शीतल यांची जोडी तर प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. यासोबतच टॅलेंट आणि भैय्यासाहेबांची व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना विशेष आवडते. त्यातील जयडी तर सर्वांनाचा आवडते. पूर्वा राजेंद्र शिंदे असे जयडीचे खरे नाव आहे. सध्या पूर्वाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

पूर्वाचा मराठमोळा लुक सध्या सोशलवर सर्वांचे लक्ष वेधू घेताना दिसत आहे. पूर्वाने साकारलेले जयडी हे कॅरॅक्टर सर्वांना आवडलेच होते. परंतु खऱ्या आयुष्यातील जयडीदेखील सर्वांना भावत आहे. पूर्वाने मस्तानी पैठणी नऊवारी साडी नेसली आहे. या फोटोत पू्र्वा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तर पूर्वाने पागल केले आहेच. जसे तिच्या अभिनयाचे अनेकजण दीवाने आहेत तसेच तिच्या लुकचेही चाहते दीवाने झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पूर्वाचे ग्लॅमरस लुकमधील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तिचे ट्रॅडिशनल लुकमधील फोटो समोर आले आहे. तिच्या या लुकमुळे चाहते चकित झाल्याचे दिसत आहे. एकदम हटके लुकमध्ये ती दिसत आहे. तिच्या एका पाठमोऱ्या फोटोने तर चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोने ट्रॅडिशलन लुकलाही सेक्सी लुकचा तडका दिला आहे.

पूर्वा शिंदेच्या आधी ही भूमिका अभिनेत्री किरण ढाणे साकारत होती. मानधन वाढवून न दिल्याने तिने मालिका सोडल्याचे समजत आहे. किरण ढाणे ही आता एका नव्या मालिकेत डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.