भन्नाट आयडिया ! बाईक रेस पाहण्यासाठी क्रेन घेवुन आले लोक, सोशल डिस्टेन्सिंगची वेगळीच पध्दत

पोलंड : वृत्त संस्था – येथील लब्लिन शहरात 13 हजार लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये बाइक रेस झाली. परंतु, सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन स्टेडियमच्या केवळ 25 टक्केच सीट बुक करण्यात आल्या. मात्र रेसप्रेमींना तर ही रेस पहायचीच होती. यासाठी रेसच्या फॅन्सने रेस पाहण्याची आणि सोशल डिस्टन्सिंगची नवी पद्धत शोधून काढली.

डेली मेलच्या वृत्तानुसार रेस पाहण्यासाठी प्रेक्षकांनी 21 क्रेन भाड्याने घेतल्या. प्रत्येक क्रेनवर जागेनुसार लोक चढले. यानंतर क्रेन्स उचलल्या गेल्या. संपूर्ण रेसदरम्यान क्रेनच्या वरून या प्रेक्षकांनी रेसची मजा घेतली.

या क्रेन्स स्टेडियमच्या चारीबाजूला एकमेकांपासून दूर उभ्या केल्या होत्या. सोबतच काही क्रेन्स स्टँडिंग लॉबीत उभ्या करण्यात आल्या होत्या. जेणेकरून प्रेक्षक सुमारे 65 फुट वरून रेसचा आनंद घेऊ शकतील.

आता ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, ऑगस्टमध्ये होणार्‍या रसेमध्ये स्टेडियम 50 टक्के भरले जाईल. आता लोक अंदाज व्यक्त करत आहेत की, असे होऊ नये की, स्टेडियमच्या चारी बाजूला केवळ क्रेनच दिसतव्यात.

प्रत्येक के्रनमध्ये दोन ते चार लोकच उभे होते. रेस संपल्यानंतर प्रेक्षकांनी क्रेनच्या वरून आतषबाजी करून आनंद साजरा केला.

या सर्व क्रेन जवळपास स्टेडियमच्या फ्लड लाइट्स पर्यंत पोहचल्या होत्या. रेस सुरू होण्यापूर्वी तीन क्रेन बुक करण्यात आल्या होत्या. परंतु, थोड्याचा वेळात त्या वाढून 9 आणि त्यानंतर 21 झाल्या. या सर्व क्रेनवर लोक होते.