Coronavirus : परदेशात अडकले बरेच भारतीय, कोण देशात परत येऊ शकत नाही ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारत, चीन, इराणसह अनेक देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने विशेष विमान पाठवले, तर परदेशात परत जाण्याची इच्छा असणार्‍या इतर अनेक देशांमध्ये अजूनही मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकले आहेत. पण परदेशात अडकलेले सर्व नागरिक देशात परत येऊ शकतात का ? या संदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घेऊया…

1. कोणत्या देशात अडकलेले भारतीय परत येऊ शकत नाहीत ?

ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आइसलँड, हंगेरी, आयर्लंड, इटली, लातविया, लिकटेंस्टीन, लिथुआनिया, लक्समबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम येथून कोणतीही एअरलाईन्स कोणत्याही प्रवाशाला घेऊन येणार नाही. हे 18 मार्च 2020 (12.00 GMT) पासून प्रभावी होईल. त्याशिवाय फिलीपिन्स, मलेशिया आणि अफगाणिस्तानातून कोणतीही विमान प्रवासी वाहतूक करणार नाही. या देशांच्या संदर्भात, हे निर्देश केवळ 17 मार्च 2020 (IST 15.00) पासून लागू आहे

2. प्रतिबंधित देशांमधून जाणाऱ्या प्रवाशांना परवानगी मिळेल का ?

अशा देशांमधून प्रवाशांना येण्याची परवानगी दिली जाणार नाही. या देशांमधून कोणत्याही भारती प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3.ते भारतात आल्यावर त्यांना क्वेर्टीनमध्ये ठेवले जाईल का ?

18 मार्च 2020 (12.00 GMT) नंतर युएई, कतार, ओमान आणि कुवैत येथून येणारे / जाणारे सर्व प्रवासी क्वार्टिनमध्ये ठेवण्यात येतील. 15 फेब्रुवारी 2020 नंतर ज्यांनी चीन, प्रजासत्ताक कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी येथे भेट दिली आहे त्यांनाही क्वार्टिनमध्ये ठेवण्यात येईल.

4. COVID-19 प्रमाणपत्र सर्व भारतीयांना बंधनकारक आहे का ?

जे प्रजासत्ताक कोरिया किंवा इटलीमधून येत आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. इटलीहून आलेल्या प्रवाशांना 18 मार्च 2020 रोजी 12.00 GMT नंतर विमानात चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

5. चीन, प्रजासत्ताक कोरिया, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी येथून प्रवास करणारे भारतीय जेव्हा देशात येतात तेव्हा त्यांना वेगळे ठेवले जाईल का ?

होय, या देशांमधून येणारे सर्व प्रवासी जेव्हा ते भारतात येतात तेव्हा वेगळे ठेवले जातील.

6. युएई, कतार, ओमान आणि कुवैतमार्गे येणाऱ्या भारतीयांना त्यांच्या देशात परत आल्यावर वेगळे ठेवले जाईल का?

होय, युएई, कतार, ओमान आणि कुवेतमार्गे जाणाऱ्या प्रवाश्यांना भारतात पोहोचताच कतारमध्ये ठेवण्यात येईल. ते 18 मार्च 2020 (GMT 12.00) पासून प्रभावी होईल.