वर्कआऊट व्हिडीओ तयार करणाऱ्या सेलेब्सवर प्रचंड ‘भडकली’ फराह खान, म्हणाली – ‘बंद करा, संकट काळातही फक्त फिगरची चिंता’ (व्हिडीओ)


पोलीसनामा ऑनलाईन :
सध्या कोरोच्या भीतीनं सारा देश लॉडाऊनमध्ये आहे. सर्व कलाकार मंडळीदेखील सध्या घरातच कैद आहेत. काही कलाकार घरातलं काम करताना दिसत आहेत. तर काही कलाकार वर्कआऊट व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. फिटनेससाठी ही चांगली संधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अशात आता निर्माता आणि कोरियोग्राफर फराह खान हिनं हिनं वर्कआऊड व्हिडीओ तयार करणाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे की त्यांनी वर्कआऊट व्हिडीओ बनवणं थांबवायला हवं.

फराह खाननं तिच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत फराह खान म्हणते, “लोकांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेता माझी सर्व सेलिब्रिटी आणि स्टार्सला विनंती कृपया तुम्ही वर्कआऊट व्हिडीओ बनवणं थांबवा आणि तिला विनाकारण टॅग करणंही थांबवा. मला या गोष्टीचा आनंद आहे की, अशा संकटसमयी देखील तुम्हाला तुमची फिगर मेंटेन ठेवण्याव्यतिरीक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची चिंता नाही.”

व्हिडीओत पुढे बोलताना फराह खान म्हणाली, “आमच्यापैकी अनेकांना इतर खूप साऱ्या गोष्टींची चिंता आहे. कृपा करून आमच्यावर दया करा. जर तुम्हाला हे जमत नसेल तर आणि मग नंतर मी जर अनफॉलो केलं तर वाईट वाटून घेऊ नका” असा इशाराही फराह खाननं यावेळी दिला.