…म्हणून फराह खानला डॉक्टरांनी दिला ‘क्वारंटाइन’मध्ये राहण्याचा ‘सल्ला’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लॉकडाउन जारी करुनही कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही. जवळपास 13 हजार 855 लोकांना विषाणूची लागण झाली आहे. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीपर्यंत सर्व स्थरातील लोक आहेत. या यादीत आता आणखी एक सेलिब्रिटीचे नाव जोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक संजय खान यांनी मुलगी फराह खान अली हिने देखील कोरोना चाचणी दिली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फराह खानच्या घरात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला होता. त्यामुळे घरातील सर्वांचीच चाचणी घेण्यात आली आहे. फराहच्या पहिला कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही 29 एप्रिलपर्यंत तिला डॉक्टरांनी क्वारंटाईनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला आहे. फराहने ट्विट करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

फराह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणार्‍या विविध घडामोडिंवर ती आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसते. या बिनधास्त शैलीमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फराहचे हे ट्विट देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. काही जणांनी तिला स्वत:ची काळजी घेण्यासही सांगितले आहे.