‘माझ्यासाठी राम मंदिर आणि मस्जिद ही दोन्ही धार्मिक स्थळे’ : अभिनेत्राी फराह खान अली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांमध्ये ही चर्चा रंगली आहे. यामध्येच अभिनेता संजय खान यांची लेक फराह खान अलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त केले आहे. ‘माझ्यासाठी राम मंदिर आणि मस्जिद ही दोन्ही धार्मिक स्थळे सारखीच आहेत’, असे ट्विट तिने केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फराह खान अलीची चर्चा रंगली आहे.

देशभरात राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा उत्साह आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर या सोहळ्याला विरोध करणारे चर्चासत्र सुरु आहेत. यामध्येच फराह खान अलीचे ट्विट लक्ष वेधून घेत आहे. मंदिर किंवा मस्जिद या दोघांपैकी आपल्याला एकाचीच का निवड करावी लागत आहे. मी दोघांकडे धार्मिक स्थळे म्हणूनच पाहते. आजकाल प्रत्येक गोष्टीचा राजकीय वळण मिळत आहे. आपल्याला चांगुलपणामधील एक टक्का भाग सुद्धा वाचवता आला नाही का? आपण दोन्ही धर्मांना समसमान प्रेम आणि आदर देऊ शकत नाही का?..पण मी असे करते,असे ट्विट फराह खान अलीने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चिले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like