फराह खाननं 8 वर्षांनी लहान असलेल्या शिरीषसोबत केलं ‘लग्न’, असं सुरु झालं होतं ‘प्रेम’प्रकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूडची फेमस कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानचा आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी जन्म दिवस असतो. फराहने सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केले त्यानंतर मैं हू ना या चित्रपटापासून फराहने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि मग त्यानंतर ओम शांती ओम, तीस मार खा आणि हॅप्पी न्यू इयर सारखे हिट चित्रपट दिले.

farah khan sirish kundar marriage

2004 मध्ये फराह ने शिरीष कुंदर सोबत विवाह केला होता या दोघांची लव्ह स्टोरी देखील खूप फिल्मी आहे. फराह आणि शिरीष हे दोघे सिनेसृष्टीमधे येण्याआधी इलेक्ट्रॉनिकल इंजीनियर होते आणि मोटोरोला कंपनीमध्ये काम करत होते.त्यानंतर शिरीषने बॉलीवूडमध्ये एडिटर म्हणून काम करायला सुरुवात केली. फराह आणि शिरीषची पहिली भेट मै हू ना च्या सेटवर झाली होती. दोघांमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कोणालाच असे वाटले नव्हते की, हे दोघे कधी एकत्र येतील. परंतु शिरीषने फराह ला प्रपोज केले. त्यावेळी फराहचे वय 32 आणि शिरीष 25 वर्षांचा होता.

farah khan

फराह सोबत लग्न केल्यानंतर शिरीषने जोकर आणि तीस मार खा सारख्या चित्रपटांचे लेखन देखील केले. परंतु दोनीही चित्रपट फ्लॉप गेले. फराह आणि शाहरुखमध्ये एकदा शिरीषमुळे वाद देखील निर्माण झाले होते. शाहरुखच्या रावण या चित्रपटाबाबत शिरीषने चुकीचे ट्विट देखील केले होते. यामुळे शाहरुख खान खूप नाराज झाला आणि त्याने तीस मार खा मध्ये काम करण्यास नकार दिला होता. तसेच एकदा शाहरुखने संजय दत्तच्या पार्टीमध्ये शिरीषच्या कानाखाली देखील लगावली होती. नंतर फराह ने प्रकरण शांत केले होते.

Shirish Kunder

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/