मलायका अरोराच्या ‘त्या’ फोटोंवर फराह खानची ‘शिवीगाळ’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशुटमुळं नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका आपल्या फोटोंमुळे चाहत्यांची मने जिंकते तर कधी तिला टीकेलाही सामोरं जावं लागतं. सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत जे प्रचंड व्हायलल होताना दिसत आहेत. चाहते तर तिचे फोटो पाहून पागल झाले आहेत. तिनं पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नुकतेच मलायकानं तिचे ऑरेंज कलरच्या हाय स्लिट साईड कटमधील तिचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटो मलायका कमलीची हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे यात शंकाच नाही. फॅशन डिझायनर जॉर्ज चक्रानं हा ड्रेस डिझाईन केला आहे. मलयाकाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. कोरियोग्राफर फराह खाननं यावर कमेंट केली. फराहनं यात शिवीचा वापर केला आहे. परंतु तिनं प्रेमानं शिवी वापरली आहे.

फराह खाननं आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे की, “कमिनी, आजच्या गेम्स नाईटमध्ये हा ड्रेस नक्की घालून ये.” फराह खाननं केलेल्या कमेंटवरही अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फराह खाननंही मलायकाचं कौतुकच केलं आहे. मलायकाचे हे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

You might also like