‘या’ शो च्या सेटवर झाली ‘फराह खान’ ला दुखापत 

मुंबई : वृत्तसंस्था – स्टार प्लस वाहिनीवरील ‘कानपुर वाले खुरानाज’ या  शोमध्ये नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिला दुखापत झाल्याची घटना घडली आहे.  या शोमध्ये फराह एका शेजारणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमधून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या शोमध्ये रसिकांना खळखळून हसविताना दिसणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फराह खानच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तरी देखील तिने चित्रीकरण करायचे ठरविले. आता ती जे काही शूट करणार आहे. ते ती एका जागेवर बसून करणार आहे. तिने काही एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले. तिच्यामुळे चित्रीकरण थांबावे, असे तिला वाटत नाही.

ही मालिका खास करून जिजा – मेव्हणीवर आधारित कौटुंबिक मालिका आहे . २०१८च्या अखेरीस हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरआठवड्यास एक नवी संकल्पना मालिकेत सादर केली जाईल.  विशेष म्हणजे या शो मध्ये  बॉलिवूडचे मोठे कलाकार ही सहभाग घेणार आहे.

स्टार प्लसवरील फॅमिली कॉमेडी शो ‘कानपुरवाले खुराणाज्‌’ मध्ये अदा खानसोबत सुनिल ग्रोव्हर, कुणाल खेमू, अलि असगर आणि सुगंधा मिश्रा प्रेक्षकांचे तुफान विनोदी मनोरंजन करताना दिसणार आहे. अदा खान व सुनिल ग्रोव्हर यांची केमिस्ट्री कशी वाटते, हे पाहणे प्रेक्षकांना  मजेशीर ठरणार आहे .