परीक्षेच्या टेन्शनमध्ये MBBS चा विद्यार्थी घर सोडून गेला, फरासखाना पोलिसांनी 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शोधलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी परीक्षेच्या टेन्शनमध्ये वडीलांना सोडून गेलेल्या तरुणाचा फरासखाना पोलिसांनी 48 तासांच्या  अथक प्रयत्नानंतर तो लोणावळा येथे सुखरूप मिळाला. केवळ सीसीटीव्हीच्या मदतीनेच त्याचा शोध घेतला आहे.

मुकुल युवराज चव्हाण (वय 24, सानपाडा, नवी मुंबई) असे या मुलाचे नाव आहे.

मुकुल हा बी.जे. मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो हॉस्टेलमध्येच राहत. त्याची 8 सप्टेंबरमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. मात्र त्याचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. त्याचे त्याला टेन्शन आले होते.

यादरम्यान त्याचे वडील मुंबईवरून त्याला भेटण्यासाठी आले होते. ते दोघेही 30 ऑगस्टला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेत असतानाच मुकुल हा वडीलांना सोडुन गायब झाला. त्याला वडिलांनी शोधले. पण तो सापडला नाही. त्याला फोन लावण्याचा प्रयत्न देखील केला. पण तो लागला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलागा मिसिंग झाल्याची तक्रार दिली. सर्व परिस्थिती सांगितली. त्यावेळी पोलिसांना मुलगा टेन्शनमध्ये असल्याचे लक्षात आल्याने पथकाने त्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली.

प्रथम पोलिसांनी सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात केली. त्यात तो दिसत होता. पोलिसांनी तो गेलेल्या प्रत्येक मार्गावर असणारे सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात केली. जवळपास 1 हजारहून अधिक सीसीटीव्ही पाहिले. दगडूशेठ गणपती मंदिरापासून ते मुंबई-पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही यावेळी पाहिले.

तत्पूर्वी सीसीटीव्ही पाहत गेले असता त्यात संगमब्रिजजवळ त्याचा मोबाईल मिळाला. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन व इतरांच्या मदतीने काही तास या नदीपात्रात शोध घेतला. पण तो मिळाला नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी सयाजी चव्हाण व आकाश वाल्मिकी या दोघांनी पुढचे सीसीटीव्ही पाहिले असता तो बोपोडीकडे जाताना दिसून आला. त्यानुसार शोध घेऊन त्याचा सुखरूप शोध घेऊन वडिलांच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भरलेल्या मनाने पुणे पोलिसांच्या कामाचे आभार मानले.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, सचिन सरपाले, बापू खुटवड, गणेश आटोळे, दिनेश भांदुर्गे, मोहन दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

असा झाला शोध…

फडके हौद- मोती चौक- तांबोळी मज्जीद-डुल्या मारुती चौक-हामजे खान चौक- इनामदार चौक- शाहीर अमर शेख चौक- आरटीओ चौक-संगमचौक-पाटील इस्टेट-अंडी उगवणे केंद्र-बोपडी-नाशिक फाटा-भक्ती शक्ती चौक यासोबतच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील या सर्व मार्गावरील जवळपास 1 हजार  सीसीटीव्ही पाहिले आहेत.