घरफोडीतील सराईत गुन्हेगार फरासखाना पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. सराईत गुन्हेगाराने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e36a3fa7-b512-11e8-bbb0-9b5329d78dad’]

जयवंत उर्फ जयड्या उर्फ जेडी गोवर्धन गायकवाड (रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

गायकवाड याला चतुश्रृंगी पोलिसांनी कारवाई करुन अटक केली असून तो सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक एम.डी. पाटील यांना मिळाली. न्यायालयाकडून प्रोडक्शंन वॉरंट घेऊन गायकवाडला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e92decea-b512-11e8-8d63-fb515f3b8613′]

ही कारवाई पोलीस उप निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार बापुसाहेब खुटवड, योगेश जगताप, पोलीस नाईक विनायक शिंदे, दिनेश भांदुर्गे, अमोल सरडे, विशाल चौगुले, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, महाविर वल्टे, हर्षल शिंदे, अमेश रसाळ यांनी केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा न्युज
पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews