Photos : अभिनेता फरदीन खानचं जबरदस्त ‘ट्रान्सफॉर्मेशन’ ! कमी केलं 18 किलो वजन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार फरदीन खान (Fardeen Khan) दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत दिसलेला नाही. अलीकडेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावरून असं दिसलं आहे की, फरदीननं त्याचं वजन कमी केलं आहे.

https://www.instagram.com/p/CIhglVZrwAI/

वजनामुळं ट्रोल होणाऱ्या फरदीन खाननं आता फिटनेसवर खूप काम केलं आहे. नव्या लुकमध्ये तो खूप हँडसम दिसत आहे. त्याचा हा लुक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळं फरदीन सध्या चर्चेत आला आहे. त्याचा फॅट टू फिट लुक साऱ्यांनाच आवडला आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना फरदीन म्हणाला, मी माझं 18 किलो वजन कमी केलं आहे. मी या लुकमुळं खूप खूश आहे. मी कधी मुंबई तर कधी लंडनमध्ये राहिलो आहे. परंतु मी जास्त काळ लंडनला घालवला आहे. माझे फोटो संकेत देत आहेत की, मी इंडस्ट्रीत परत येत आहे.

https://www.instagram.com/p/CIcVelRBVL4/

अशी माहिती आहे की, फरदीन खान लवकरच सिनेमात दिसणार आहे. त्याला सिनेमाची ऑफर मिळाली आहे. डायरेक्टर मुकेश छाबडा सोबत तो सिनेमा करू शकतो. सध्या त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो मात्र सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे.