बाप्पाला वाजत गाजत निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात

गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे देशाचे नव्हे तर जगाचं लक्ष असते. मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. मुंबईतील पहिला मानाचा गणपती म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. गणेश गल्लीच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर अन्य गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात होते.

गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’caa89207-bef5-11e8-b429-47b388b10980′]

सर्वांचे आकर्षणाचा केंद्र असलेला लालबागचा राजा सकाळी दहाच्या सुमारास मंडपातून बाहेर पडला़ लालबागच्या राजाची जंगी मिरवणूक हे मुंबईतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक बँड, लेझिम आणि ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट मधून निघाली आहे़ मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, आॅपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी इथे जाते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास लालबाग राजाचे खोल समुद्रात विसर्जन केले जाते.

[amazon_link asins=’B01FM7GGFI,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db3887b1-bef5-11e8-b4b8-af0b5d545e0d’]

लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत विविध रंग आणि छटा. मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी, फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी सजला. हजारो भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी कोळी बांधव नृत्य सादर करण्याची जुनी परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे आजही कोळी महिला कोळी नृत्य सादर करून लालबागच्या राजाला निरोप देत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर लालबागला पुष्पवृष्टी केली जाणार आहे. लालबागमधल्या श्रॉफ इमारतींच्या रहिवाशांकडून ही पुष्पवृष्टी होते. यंदा तब्बल सहाशे किलो फुले आणि गुलाल उधळून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

पुणे : श्रीमंत दगडु शेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार ‘विश्व विनायक’ रथातून

मुंबईतले लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया मंडळाचा गणपती या मानाच्या गणपतींसोबतच लालबागच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या सर्वच गणेशमूर्तींवर ही पुष्पवृष्टी होईल.
स्टिंग रे, जेलीफिशसारख्या माशांचा दंश होऊ नये यासाठी भाविकांनी पाण्यात विसर्जनासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदेशी पाहुण्यांसाठी विशेष मंडप, चौपटीवर विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यंदा निलांबरी बसची सुविधा सुद्धा केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like