Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

पोलीसनामा ऑनलाइन : Farhad Samji | काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती. अनेक स्तरावरून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटीनी सोशल मीडियावर सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत पोस्ट शेअर केली आहे. (Farhad Samji)

दिग्दर्शक फरहाद सामजी यांनी सुद्धा सतीश कौशिक यांच्या बद्दल भाष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गीतकारापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात सतीश कौशिक यांनी कशा पद्धतीने त्यांना साथ दिली मदत केली याचा खुलासा त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये केला आहे.

यावेळी फरहाद सामजी (Farhad Samji) म्हणाले, “मी माझ्या करिअरची सुरुवात 22 वर्षांपूर्वी केली.
यावेळी मी पहिले गाणे लिहिले. ते सलमान खानने ऐकले आणि ‘मला हम किसीसे कम नही’ या चित्रपटातून
ब्रेक मिळाला. या संपूर्ण घटनेवर सतीश कौशिक देखील आमच्यासोबत होते.
सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती होती ज्यांनी माझे कौतुक केले, मला प्रोत्साहन दिले. अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा त्यांनी मला दिली. आता येत्या ईदच्या मुहूर्तावर आमचा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सतीश कौशिक सुद्धा दिसतील. त्यांच्यासाठी मी धमाल पत्र लिहिले आहेत. या चित्रपटात सतीश कौशिक यांचे फार उत्तम काम तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे”.

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सतीश कौशिक यांची छोटीशी भूमिका
पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
याचबरोबर फरहाद हे बहुचर्चित ‘हेराफेरी 3’ चित्रपटावर ही काम करताना दिसत आहेत.

Advt.

Web Title :- Farhad Samji | director farhad saamji speaks about late actor satish kaushik says he was the first to encourage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा