तर ‘या’ महिन्यात गर्लफ्रेंड शिबानी सोबत फरहान करणार लग्न 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसापासून गर्लफ्रेंड शिबानी सोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. अनेकवेळा दोघे एकत्र दिसून येतात. तसेच दोघे सोशल मीडियावर आपले फोटो शेअरही करत असतात. हे रोमँटिक कपल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरत असताना. त्यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. खुद्द फरहानने याचा खुलासा केला आहे.

अलीकडेच फरहान अख्तरने भूमी पेडणेकरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये भूमीने फरहानसोबत ‘डोन्ट प्ले’ गेम खेळला. या खेळात भूमीने फरहानला एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये शिबानीचा आवाज होता. यात शिबानी फरहानला एक प्रश्न विचारत होती. आपण कधी लग्न करतोय, एप्रिल किंवा मे मध्ये. कारण मी खूप कंफ्यूज आहे, असा हा प्रश्न होता. शिबानीचा हा प्रश्न ऐकताच, फरहानचा चेहरा खुलला. आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. यानंतर आपण कदाचित एप्रिल किंवा मे महिन्यात लग्न करू शकतो, असे उत्तर त्याने दिले.

अलीकडेच फरहानने त्याच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता या फोटोत शिबानी आणि फरहानच्या बोटात अंगठी दिसत आहे. या फोटोवरुन दोघांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा होत आहे. फरहानने २०१७ साली पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला होता. या पहिल्या लग्नपासून फरहानला दोन मुली सुद्धा आहे.