Farhan Akhtar | बॉक्सरसारखी बॉडी बनवण्यासाठी फरहानने केली खुप मेहनत, जाणून घ्या त्याच्या फिटनेसचे 7 सीक्रेट

नवी दिल्ली : Farhan Akhtar | बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा आज ४९ वा वाढदिवस आहे. तो आज बॉलिवूडमधील सर्वात व्हर्सटाइल आणि मल्टी-टॅलेंटेड स्टार्सपैकी एक आहे. फरहान एक अभिनेता, दिग्दर्शक, स्क्रीन रायटर, निर्माता आणि प्लेबॅक सिंगर देखील आहे. फरहानच्या ‘तुफान’ चित्रपटात त्याचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. बॉक्सरसारखी बॉडी तयार करण्यासाठी फरहानने खूप मेहनत घेतली. फरहान अख्तर त्याच्या फिटनेस आणि शरीराची कशी काळजी घेतो ते जाणून घेऊया. (Farhan Akhtar)

१. सायकलिंग

फरहान जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फुटबॉल खेळतो आणि रोज सायकल चालवतो. मीडिया रिपोर्टनुसार, तो दररोज २२ किलोमीटर सायकल चालवतो.

२. व्हॉलीबॉल

फरहानला व्हॉलीबॉल आवडतो आणि तो अनेकदा व्हॉलीबॉल खेळताना दिसतो. हे सर्व त्याला शारीरिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह आणि फिट ठेवते.

३. हेवी वर्कआउट

फरहान अख्तरचे मत आहे की फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सकस आहार, व्यायाम आणि हेवी वर्कआउट आवश्यक आहे. (Farhan Akhtar)

४. घरचे अन्न

फिटनेसची काळजी घेण्याव्यतिरिक्त, तो क्वचितच बाहेरचे अन्न खातो कारण त्याला घरचे अन्न जास्त आवडते.

५. फरहानचा डाएट

फरहान डाएटची विशेष काळजी घेतो. तो फळांचा ज्यूस, अंडी, चिकन आणि मासे खातो.

६. हिरव्या भाज्या

फरहान भाज्यांमध्ये ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवलेली ब्रोकोली आणि कोबी खातो. याशिवाय तो आपले मसल्स हेल्दी आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन शेक देखील पितो.

७. वेळेचे नियोजन

फरहान रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला सकाळी लवकर उठून व्यायाम, सायकलिंग करता येईल.

Web Title :- Farhan Akhtar | farhan akhtar birthday farhan worked too hard to make body like boxer know 7 secrets of his fitness

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस

Sanjay Raut | शिंदे सरकारच्या भवितव्याबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हे तर…’

Jitendra Awhad | कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार – जितेंद्र आव्हाड.