बॉलिवूडमध्ये प्रत्येक ‘आउटसाईडर्स’ला वाईट वागणूक दिली जाते का ? फरहान अख्तरनं सांगितलं ‘सत्य’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. बॉलिवूडमधील पॉलिटीक्स आणि गटबाजीवरूनही बोललं जात आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. आता पर्यंत अनेक कलाकारांनी नेपोटीजम आणि गटबाजीवरील त्यांचं मत मांडलं आहे. आता बॉलिवूड स्टार फरहान अख्तर यानं यावर भाष्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तो बोलत होता.

‘प्रत्येकच आउटसाईडर्सला वाईट वागणूक दिली जात नाही’
फरहान अख्तर म्हणाला, “आपली इंडस्ट्री यश आणि अपयशाच्या तराजूवर चालते. आता जर तुम्ही विचारलं की, स्टार किड्सला विशेष फायदा मिळतो का तर मी सांगेन हो निश्चितच मिळतो. तुम्ही विचाराल त्यांना सहज काम मिळतं का तर मी सांगेन हो त्यांना नक्कीच सहज कामं मिळतात. परंतु काय हे वाईट आहे का. तर मी म्हणेन अजिबात नाही. त्यांच्या पालकांनी एवढी मेहनत केलेली असते तेव्हा कुठे त्यांच्या मुलांना त्याचा फायदा मिळतो. मला हे म्हणायचं आहे की, बॉलिवूडमध्ये प्रत्येकच आउटसाईडर्सला वाईट वागणूक दिली जात नाही.”

बॉलिवूडमधील माफियांबद्दल फरहान म्हणतो…
बॉलिवूडमधील माफियांबद्दल बोलताना आपण या सगळ्यापासून दूर असल्याचं सांगत फरहान म्हणाला, “मला नाही माहित हा कोणता क्लब आहे. हा कोणता विभाग आहे जो हे सर्व कंट्रोल करतो. आता कोणत्याही इंडस्ट्रीत वेगवेगळे सर्कल तर असतातच. “