12 वर्षांच्या मुलीनं केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले – ‘तो अन्य कुणावर तरी प्रेम करतो’

फरीदाबाद : दिल्ली लगतच्या फरीदाबादमधून अल्पवयीन मुलांच्या पालकांना हादरवून सोडणारे वृत समोर आले आहे. येथे एका 12 वर्षीय मुलीने प्रेमात फसवणूक झाल्यानंतर मृत्यूला कवटाळले. याचा खुलासा तिच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून झाला आहे. सध्या पोलीसांनी प्रकरण दाखल केले असून तपास सुरू आहे.

हे प्रकरण हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील आहे. येथे एका 12 वर्षाच्या मुलीने प्रेमात अपयशी ठरल्यानंतर मृत्यूला जवळ केले. मुलगी फरीदाबादच्या बल्लभगढ परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहात होती, जिचे आपल्या शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलावर प्रेम होते. मुलीने सुसाईड नोटमध्ये खुलासा करताना लिहिले आहे की, ती शेजारी राहणार्‍या समवयस्क मुलावर प्रेम करत होती, परंतु तो अन्य कुणावर तरी प्रेम करत होता.

सुसाईड नोटमधून झाला खुलासा
यामुळे दु:खी होऊन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या वडिलांच्या माहितीनुसार त्यांना याबाबतची माहिती सुसाईडमधूनच मिळाली. तर याबाबतीत पोलीस प्रवक्ता एसीपी आदर्शदीप यांच्यानुसार, एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमात धोका मिळाल्यानंतर आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. योग्य ती करवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.