खळबळजनक ! पती-पत्नीला दोरीनं बांधला, नंतर गोळी घालून केला ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये पती-पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना जसाना गावची आहे. हत्येपूर्वी दोघांना दोरीने बांधले होते आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रॉपर्टीच्या वादावरून हे हत्याकांड घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, पती आणि पत्नीचे वय सुमारे ३० वर्ष आहे. घरात घुसून आरोपींनी प्रथम पती व पत्नीला दोरीने बांधले व नंतर गोळी घातली. सध्या पोलिसांनी दोघांचा मृतदेह बादशाह खान रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातून माहिती गोळा केली जात आहे.

मोनिका आणि सुखबीरचे २०१३ मध्ये लग्न झाले होते आणि काही काळापासून मोनिका तिच्या पतीसोबत माहेरील घराजवळच घर घेऊन राहत होती. दरम्यान पोलिसांना शेजारच्या घराबाहेर लावलेले सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले आहेत. यामध्ये दुचाकीस्वार चार जण आधी घरात शिरताना दिसले आणि नंतर घाबरुन पळत निघाल्याचे दिसत आहे.

या चार जणांचा पोलिस तपास करत आहेत. मृताचा भाऊ मनीषच्या म्हणण्यानुसार, त्याची बहीण मोनिका संध्याकाळी दूध घेण्यासाठी डेअरीत जात असे. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा मोनिका आली नाही, तेव्हा तो स्वतः दूध देण्यासाठी घरी आला त्यावेळी त्याने पाहिले की, घरातील सर्व लाईट्स बंद होती आणि दोघांचे मृतदेह आत पडून होते.

मृताचे काका महेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे की, दोघांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडाला टेप लावला गेला आणि त्यांच्या डोक्यात गोळी मारली गेली. दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र पोलिस अद्याप या संदर्भात काही बोलण्याचे टाळत आहेत.