Farm Laws | कृषी कायदे रद्द होताच अनेक सेलिब्रिटींनी केले शेतकऱ्यांचे अभिनंदन; कंगना मात्र भडकली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Farm Laws | गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers’ Agitation) सुरू होते. या आंदोलनाला अखेर आज यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज सकाळी देशवासीयांना संबोधित करताना हा निर्णय घोषित केला आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन यावेळी केले.

 

पंतप्रधानांनी तीन कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल ट्विट करून त्यांचे आभार मानले. ‘ही उत्तम बातमी आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान कार्यालय. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. गुरुनानक जयंतीच्या दिवशी तुम्ही आनंदानं घरी परताल अशी आशा करतो,’ असं सोनूने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 

 

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूनंदेखील (Tapasi Pannu) या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुरुपुरब दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा असं म्हणत तिनं तीन कायदे रद्द करण्यात आल्याची बातमी शेअर केली. अभिनेत्री सयानी गुप्तानंदेखील (Sayani Gupta) शेतकऱ्यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. ‘शेतकऱ्यांचं अभिनंदन. तुम्ही हे शक्य करून दाखवलंत. आंदोलन कामी आलं. ज्या शेतकऱ्यांनी जीव गमावला, त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. देव आपला अन्नदात्यासोबत सदैव राहो. जय जवान, जय किसान!’, अशा भावना सयानीनं ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. (Farm Laws)

 

 

यादरम्यान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारी कंगना राणौत हिने आजही वादग्रस्त विधान केलं.
तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी, लाजिरवाणा असल्याचं तिने म्हंटले आहे.
‘लोकप्रतिनिधींनी संसदेत कायदे करण्याऐवजी लोक रस्त्यावरून येऊन कायदे करू लागले,
तर हेदेखील जिहादी राष्ट्र आहे. असं राष्ट्र ज्यांना हवंय, त्या सगळ्यांचे अभिनंदन,’
अशा शब्दांमध्ये कंगनाने (Kangana Ranaut) आपली नाराजी व्यक्त केली.

 

Web Title :- Farm Laws | actor sonu-sood taapsee pannu and others congratulate farmers repealing farm laws kangana ranaut calls it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा