Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

नवी दिल्ली : Farm Laws | कृषी कायदे रद्द करण्याचे आम्ही स्वागत करतो. पण, गेल्या वर्षभरात या शेतकरी आंदोलनात ६०० शेतकर्‍यांचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण अशा शब्दात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्ला चढवला आहे. निवडणुका आल्या की महागाई कमी करण्याची घोषणा करायची. लोकांना भुलविण्याचा पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली असण्याची शक्यता आहे, अशी टिका काँग्रेसचे नेते आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे.

शेतकरी नेते अजित नवले (Ajit Navle) यांनी सांगितले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत करतो. ही घोषणा करताना मोदी यांनी आम्ही शेतकर्‍यांना समजविण्यात कमी पडलो असे म्हटले आहे. यावरुन त्यांनी नाईलाज म्हणून हे कायदे मागे घेतल्याचे दिसते. मग गेल्या वर्षभरात या आंदोलनात ६०० शेतकर्‍यांचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला (Farm Laws) आहे. (PM modi announces repeal all 3 farm laws)

मोदी सरकारने (Modi Government) गेल्या वर्षी तीन कृषी कायदे मंजूर करुन घेतले होते. त्याला देशभरातून प्रचंड विरोध झाला. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशामध्ये याविरोधात प्रचंड प्रमाणावर विरोध झाला. संयुक्त शेतकरी आंदोलनात देशभरातील ५०हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या. त्यांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर आंदोलन करुन सर्व रस्ते बंद केले होते. शेतकरी आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला.

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर जाण्याचे आंदोलन शेतकर्‍यांनी जाहीर केल्यावर शेतकर्‍याच्या एका गटाने लाल किल्ल्यावर धडक देऊन तेथे तिरंगाबरोबर आंदोलनाचा झेंडा फडकावला होता. त्यावरुन देशभर आंदोलकाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याचा फायदा घेऊन हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला होता. त्याच वेळी लाल किल्ल्यावर झेंडा फडकाविणारा भाजपचा (BJP) समर्थक असल्याचे समोर आले. शेतकरी टिकैत यांना आंदोलकावर पोलीस कारवाई करत असल्याचे पाहून अश्रु अनावर झाले. ते सर्व देशभरातील लोकांनी पाहिले. त्यानंतर आपल्या गावी परतणारे शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमेवर परतले होते.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतरही हे शेतकरी आंदोलन सुरु राहिले. केंद्र सरकारने शेतकर्‍यांशी चर्चाही बंद केली होती. मात्र, पोटनिवडणुकीचे निकाल आणि आगामी पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका यामुळे शेतकर्‍यांचा रोष कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तीनही कृषी कायदे मागे (Farm Laws) घेण्याची अचानक घोषणा करुन पुन्हा एकदा देशवासियांना धक्का देण्याचा आपला प्रयोग कायम ठेवला आहे.

हे देखील वाचा

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Farm Laws | Big victory for farmers’ movement! The movement starts from last year; Why 600 farmers were killed?, Opposition attacks PM Narendra Modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update