Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागील आठवड्यात तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली. देशात तीन कृषी कायदे लागू केल्यामुळे शेतकरी कृषी कायद्यांविरोधात मागील वर्षभरापासून आंदोलन (Farmers Agitation) करत आहेत. या आंदोलनादरम्यान 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अखेर मोदी सरकारने (Modi Government) कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

 

यामुळे कृषी कायदे रद्द

 

मोदी सरकारने मानवतेच्या आधारावर कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे एका वृत्तवाहीने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
तीन कृषी कायद्यांना आधीच स्थगिती देण्यात आली होती. कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करत होते.
विरोधकांनी त्यांची दिशाभूल करु नये यासाठी केंद्राने हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, असा दावा सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी केला आहे.

 

शेतकऱ्यांनी विधकांच्या प्रचाराला बळी पडू नये

 

हिवाळा (winter) आणि मानवतेच्या (humanity) आधारे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात अल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये. शेतकऱ्यांनी आपल्या घरी जावं, या हेतूनं कृषी कायदे रद्द केले आहेत.
एमएसपी (MSP) आणि इतर अनुदानाबद्दल निर्णय घेण्यासाठी एक समिती (committee) स्थापन करण्यात आली आहे.
त्यासाठी वेळ लागेल. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांनी विरोधी पक्षांच्या प्रचाराला बळी पडू नये, असे सरकारला वाटतं.

 

आंदोलन सुरुच राहणार

 

मोदी सरकारने तीन कृषी कायदे (Farm Laws) रद्द केले असले तरी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चानं घेतला आहे.
पुढील रणनिती निश्चित करण्यासाठी 29 नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनांची महापंचायत आहे. एमएसपीच्या (MSP) मुद्यावरुन शेतकरी आंदोलन सुरु राहणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) कायदे रद्द झाल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ असं राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सांगितले.
मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते कुठे पूर्ण झालं, असा सवाल करत टिकैत यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर अविश्वास व्यक्त केला.

 

Web Title : Farm Laws | Modi government sources says decision pm narendra modi repeal three farm laws was taken humanitarian Farmers Agitation Farm Laws marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Foreign Liquor Prices | इतर राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई; परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार

Sapna Choudhary | सपना चौधरीनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, डान्सचा ‘हा’ व्हिडीओ झाला व्हायरल

Pollution Affecting Your Brain | तुमचा मेंदूसुद्धा कमजोर करतंय घातक प्रदूषण, विस्मरण होत असेल तर व्हा सावध; जाणून घ्या