खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन 

पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी भंडारा-रामटेक रस्त्यावर टायर पेटवून आपला संताप व्यक्त केला तसेच सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून वाहनाला घेराव घातला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2acc57b6-c56a-11e8-91ff-b537d71d0f10′]

ह्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पिकांना पाण्याचा  तुटवडा भासत आहे . गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी पिके वाळत आहेत. पाणी सोडण्यासाठी विनंती करूनही पेंच प्रकल्प पाणी सोडत नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात खुर्शीपार येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  भंडारा-रामटेक राज्य मार्गावरील खुर्शीपार येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको केला.

औषध संपली , तुम्ही बाहेरून घेऊन या : औरंगाबाद घाटी रुग्णालयाचा प्रताप

मिळालेल्या माहितीनुसार ,भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथील शेतकऱ्यांनी धान पिकाला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सुरु केलेल्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे .याठिकाणी सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन सोनटक्के पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्यात प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून त्यांना धक्काबुक्की केल्याचे समजते.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52dbdb15-c56c-11e8-ad11-c5f1fc9d0996′]

जाहीरात