’किसान बिल क्रांतिकारी’, PM मोदी यांनी सांगितले 10 फायदे, विरोधकांवर साधला निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कृषीसंबंधी बिलावर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. बिहारमध्ये विकास योजनांच्या उद्घाटनांनतर संबोधित करताना ते विरोधकांवर जोरदार बरसले. पीएमने म्हटले की, आपले राजकारण चमकवण्यासाठी विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत आणि खोटे बोलत आहेत. यावेळी पीएमने केंद्र सरकारच्या विधेयकांचे फायदेसुद्धा सांगितले.

पीएम मोदींनी सांगितले हे फायदे
1. या विधेयकांनी आपले अन्नदाता असलेल्या शेतकरी बंधुंना बंधानातून मुक्त केले आहे. या सुधारणांमुळे शेतकर्‍यांना आपले उत्पादन विकण्यासाठी जास्त पर्याय आणि संधी मिळतील.

2. या बिलामुळे आडत्यांची सिस्टम नष्ट होईल. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये जे आडते म्हणजेच दलाल होते, जे शेतकर्‍यांच्या कमाईचा मोठा भाग स्वता घेत होते, त्यांच्यापासून वाचण्यासाठी हे विधेयक आणणे आवश्यक होते. हे विधेयक शेतकर्‍यांसाठी सुरक्षाकवच आहे.

3. कुणीही व्यक्ती आपले उत्पादन हवे तिथे विकू शकतो, मात्र शेतकर्‍यांना या हक्कापासून वंचित ठेवले होते. आता नव्या तरतुदींमुळे शेतकरी आपले पीक देशातील कोणत्याही बाजारात हव्या त्या भावात विकू शकतात.

4. सरकारकडून शेतकर्‍यांना एमएसपीचा लाभ दिला जाणार नाही, हेसुद्धा खोटे आहे. आमचे सरकार शेतकर्‍यांना एमएसपीच्या माध्यमातून योग्य भाव देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. सरकार खरेदी सुद्धा पूर्वीप्रमाणे सुरूच ठेवणार आहे.

5. केंद्राच्या योजनेद्वारे शेतकर्‍यांच्या खात्यात एक लाख कोटी रूपये ट्रान्सफर केले गेले आहेत. अनेक योजना पूर्ण केल्या आहेत. सिंचनासाठी वेगळी योजना बनवण्यात आली आहे.

6. प्रथम नीतीश सरकारने बिहारमध्ये हा कायदा हटवला, ज्यानंतर आता बिहारचे हे मॉडल संपूर्ण देश लागू करत आहे.

7. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात याचे आश्वासन दिले होते, परंतु आता विरोध करत आहे. हे लोक शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत.

8. काँग्रेसच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि सतर्क राहा. हे शेतकर्‍यांच्या रक्षणाचा गाजावाजा करतात, परंतु दलालांची साथ देत आहेत.

9. ट्विटकरून सुद्धा पीएमने विरोधक भ्रम पसरवत असल्याचा आरोप केला होता.

10. जेवढे सरकारने 6 वर्षात केले आहे, तेवढे या अगोदर कधीही केले गेले नाही. शेतकर्‍यांच्या समस्या दूर करण्यासाठी आमच्या सरकारने निरंतर प्रयत्न केले आहेत, असे पीएम म्हणाले.