शेतात अफू पिकवणार्‍या शेतकर्‍याला अटक

पोलीसनामा ऑनलाईन – शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्या पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपल्या शेतात कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणू अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलीसांनी सांगितले की, भीमराव लक्ष्मण ननवरे (53, स्वामी चिंचोली, दौंड) असे अटक केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ननवरे याची स्वामी चिंचोली गावात शेती आहे. त्याने आपल्या शेतात कांदा, मुळा, हरभरा या पिकांमध्ये आतंरपीक म्हणून अफूची लागवड केली होती. याबाबत पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी ननवरेच्या शेतात छापा टाकला व ओली तसेच सुकलेली अकरा हजार रूपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. ननवरेला न्यायालयात हजर केले असता त्याला 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.