नोकरी सोडली, You Tube च्या मदतीने टेरेसवर केली केशरची शेती अन् आता कमावताहेत लाखो रुपये !

गुडगाव : वृत्तसंस्था – हरियाणाच्या हिसारच्या दोन तरुण शेतकऱ्यांनी घराच्या छतावर केशरची शेती केली. केशरच्या या शेतीमुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण आत्तापर्यंत केशरची शेती फक्त जम्मू-काश्मीरमध्येच केली जात होती. मात्र, शेतकऱ्यांनी ऐयरोफोनिक विधीच्या माध्यमातून केशर उगवून जवळपास 6 ते 9 लाख रुपयांचा नफा मिळवून सगळ्यांना आश्चर्यचकित केले.

तरुण शेतकऱ्यांनी लॉकडाऊनदरम्यान हे विशेष काम केले. आत्तापर्यंत ऐयरोफोनिक पद्धतीने इराण, स्पेन, चीनमध्ये केशरचे रोप लागवडीची तयारी केली जात होती. तर भारतात सर्वाधिक जम्मूमध्ये केशरची शेती केली जाते आणि पूर्ण देश-परदेशात जम्मूतूनच पुरवठा केला जातो. मेहनत, निष्ठा आणि चिकाटीमुळे कोणतेही मोठ्यातले मोठे काम सोपं होते, असे या तरुण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कोथकला येथे राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोन सख्ख्या भावांनी केशरच्या शेतीसंबंधी सर्व माहिती गुगल आणि यूट्यूबच्या माध्यमातून घेतली. या केशरच्या 250 बिया प्रति किलोच्या हिशोबाने दोघांनी जम्मू येथून खरेदी केल्या. त्यांनी त्यांच्या आझादनगर येथील घरात 15 बाय 15 आकाराच्या रुमच्या छतावर ट्रायल म्हणून केशरची शेती करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रोजेक्ट ऑगस्ट ते नोव्हेंबर, 2020 पर्यंत पूर्ण झाला.

दीड किलो केशरचे उत्पन्न
केशरच्या ट्रायल शेतीदरम्यान 100 किलोंपेक्षाही जास्त वजनाच्या केशरची शेती केली. त्यामध्ये त्यांना 1 ते दीड किलो केशरचे उत्पन्न मिळाले. त्यांना पहिल्यांदा 6 ते 9 लाख रुपयांचा फायदा झाला. जवळपास अडीच ते तीन लाख रूपये केशरच्या प्रतिकिलोसाठी मिळतात.