पीक कर्जाचे हफ्ते न फेडता आल्यानं शेतकर्‍याची आत्महत्या, सोनं गहाण ठेवून घेतलं होतं Loan

भूम : दुष्काळ आणि नापिक या नैसर्गिक संकटाना मराठवाड्यातील शेतकरी (farmer commits suicide) पुरता कंटाळून गेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अशीच एक घटना भूममध्ये घडली आहे.

कर्जाचा डोंगर होताच त्यातच सोयाबीन पेरणीसाठी सोने गहाण ठेवले. पण सोयाबीन काही उगवून आले नाही आता दुबार पेरणी करावी लागणार, कर्ज कसे फेडायचे आणि सोने कसे सोडवायचे या संकटामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कल्याण क्षिरसागर(वय ५८ रा. होडोंग्री ता. भूम, जि. उस्मानाबाद ) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. कल्याण क्षिरसागर यांनी वर्षभरापूर्वी अडीच तोळं सोने गहाण ठेऊन ज्योती क्रांती मल्टिस्टेटमधून कर्ज घेतलं होतं. पण हे गहाण ठेवलेलं सोनं सोडवता आला नाही. त्यातच बँक ऑफ इंडियातून ४० हजार रुपयांचं पीककर्ज देखील घेतलं होतं. तसेच मृत क्षिरसागर यांचा मुलगा अमोल क्षिरसागर यांच्या नावावर देखील ७० हजार रुपयाचं कर्ज होतं.

हे पीककर्ज काढून त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सर्व
आर्थिक गणिते सुटणार होती. मात्र, सोयाबीन उगवलेच नाही. दुबार पेरणीचं संकट ओढावलं. दुबार
पेरणी करायला पैसे नाहीत, आधी घेतलेले कर्ज कसे फेडायचे यामुळे नैराश्य आलेल्या क्षिरसागर
यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली
आहे.

हे देखील वाचा

महिला सहकार्‍याचं चुंबन घेतानाचे फोटो झळकले वर्तमान पत्रात, युकेच्या आरोग्य सचिवांचा राजीनामा

Pandharpur Crime News | धक्कादायक ! मटणाचे जेवण दिले नाही म्हणून केले गळ्यावर वार

Ajit Pawar | संजय राऊतांचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘अटक आरोपीच्या पत्रावर अजितदादांची CBI चौकशी कशी काय होऊ शकते?’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  farmer commits suicide after not being able to get gold back bhoom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update