खळबळजनक ! मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी भाजपचा ‘T शर्ट’ घालून शेतकर्‍याची आत्महत्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर येण्याआधीच एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुन्हा आणूया आपले सरकार असा मजकूर असलेला भाजपच टी-शर्ट घालून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. प्रचारादरम्यान शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्याने भाजपचा टी शर्ट घालून आत्महत्या केल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड या ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजू ज्ञानदेव तलवारे (वय-35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी येवल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.

एकीकडे सर्वच पक्षांचे नेते आपल्या प्रचारामध्ये आश्वासनांच्या टोपलीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मुद्यावरून प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या राज्यामध्ये विधानसभेचे वारे वाहत आहे. प्रत्येक नेता शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करताना दिसत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नसल्याचे समोर आलं आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like