धक्कादायक ! ‘पीक’ वाचवण्यासाठी गमवावा लागला जीव ; शाॅक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेव येथे शेतीच्या पाण्यासाठी चारीमध्ये विद्युत पंप बसवताना एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. नारायण शिवाजी लावंड असे या शेतकऱ्याचे नाव असून ते रुई येथील रहिवासी होते.

उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने शेतीतील पिके वाचणीण्यासाठी येथील शेतकरी चारी खोदून त्यामध्ये विद्युतपंप बसवत आहेत. असाच एक विद्युत पंप चारीमध्ये बसवल्यानंतर त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading...
You might also like