रानडुकराच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी ठार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन  –  शेतातील पिकाचे नुकसान करीत आहेत, तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या महीला-पुरूषांवर वन्यप्राणी हल्ले करत आहेत. एम. एस. गायकवाड (६० वर्षे ) हे स्वतःच्या शेत जमिनीवर गेले असता रानडुकरांच्या कळपाने गायकवाड यांच्यावर सामुहिक हल्ला करत त्यांच्या डोक्यावर, छातीवर, मोठया जखमा दिसुन आल्या.

आजुबाजुच्या लोकांनी रानडुकरांना हकलण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत माधव सुभान गायकवाड याना गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या माधव गायकवाड यांचा नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार चालु आसताना मृत्यू झाला आहे.

Visit : Policenama.com