निवडणूक प्रचारात शेतकरी मृत्यूचा मुद्दा होतो, मग शहीद जवान का नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या मुद्दा होतो. तर मग शहीद जवानाचा का होत नाही असा प्रतिप्रश्न नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी शहीद जवानांचा उल्लेख करून मत मागितल्याचा आरोप केला जात आहे. देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच देशभक्ती आणि शहदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनाल दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मागील ४० वर्षापासून देश दहशतवादाशी लढत आहे. जर देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत तर त्याला काय अर्थ राहणार ? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का ? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे.

हजारो भारतीय जवान देशासाठी शहीद होतात, मग हा मुद्दा निवडणुकीत का नको ? जेंव्हा शेतकऱ्याचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो. मग जेव्हा एक जवान देशासाठी शहीत होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही ? असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना तुमचं पहिलं मत हे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करा असं आवाहन जाहीर व्यासपीठावरून केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. शहीद जवानांच्या नावाचा वापर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करून याचं राजकारण करत असल्याचा आरोप केला जात होता त्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे.