Jalgaon News : विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दहीगाव (ता. यावल) येथे बुधवार (दि. 3) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रेमचंद उर्फ गजानन रामदास महाजन (56) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महेंद्र दिनकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते ते स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीत पाण्याची पातळी पहात होते. त्याचवेळी पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.