दुर्दैवी ! ‘तू सांभाळून घे’ म्हणत मोठ्या भावाची विष पिऊन आत्महत्या

फुलंब्री : पोलीसनामा ऑनलाईन – गुरुवारी सकाळी रामेश्वर तेजराव लहाने या तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात विष प्राशन करीत आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्याच्या अगोदर मला कर्ज फेडणे शक्य नाही, भावा ते सांभाळून घे, असे त्याने लहान भावाला फोन करून सांगितले. त्याने फोन केल्यावर संपूर्ण कुटुंबाची धावपळ उडाली व रामेश्वर याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. पीरबावडा परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान खूप नुकसान झाले त्यामुळे रामेश्वर चिंतेत होता. रामेश्वर याला आई -वडील दोन भाऊ व चार बहिणी आहेत व त्यांच्याकडे फक्त सहा एकर कोरडवाहू शेती आहे. तसेच त्याने कोरोनामध्ये बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले.

अवकाळी पावसामुळे पिकाचे खूप नुकसान झाले त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करणार या चिंतेने त्याने विष पिऊन आत्महत्या केली.